‘पुरवणी मागण्यां’चाच विक्रम; प्रश्नांचा मात्र नित्यक्रम!
मार्च महिन्यात पार पडलेला सन २०२६-२७ चा राज्य अर्थसंकल्प ७,६९,३५६ कोटी रुपयांचा आहे. हा अर्थसंकल्प ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या महत्त्वाकांक्षी स्वप्नावर आधारित असल्याचा दावा करण्यात आला होता. अवघ्या तीनच महिन्यात राज्य सरकारचा दावा फोल ठरला तो पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांच्या अवाढव्य आकारमानामुळे. याआधी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात उच्चांकी, म्हणजे विक्रमी ९४,८८९ […]
